आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या सुरक्षेत वाढ

15

नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर २०२२: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी त्यांचे सुरक्षा कवच Z+ पर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांना संपूर्ण भारतात झेड प्लस सुरक्षा दिली जाणार आहे. सध्या त्यांना ईशान्येत झेड श्रेणीची सीआरपीएफ सुरक्षा होती.

केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्रीय सुरक्षा एजन्सीशी सल्लामसलत करून सरमाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ईशान्येकडील त्यांची सध्याची झेड श्रेणीची सीआरपीएफ सुरक्षा संपूर्ण भारतातील झेड प्लस श्रेणीमध्ये वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सुरक्षा एजन्सीने सरमा यांची सुरक्षा वाढवण्याची शिफारस केली होती. यानंतर, गृह मंत्रालय आणि सुरक्षा एजन्सी यांच्यात परस्पर सल्लामसलत केल्यानंतर, त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

५० कमांडो तैनात

‘Z+’ श्रेणीच्या सुरक्षेअंतर्गत, आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत ५० CRPF कमांडो सदैव तैनात असतील. त्यांना हे संरक्षण देशभर मिळणार आहे. यापूर्वी सरमा यांना २०१७ मध्ये झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती, ही सुरक्षा त्यांना फक्त आसाम राज्यासाठी देण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.