सोलापूर, ०८ऑगस्ट २०२२: सोलापूरातील सुरक्षा ठेव परत देण्यासाठी कंत्राटदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेणारा एनटीपीसीचा अधिकारी गोविंदकुमार याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. युटिलीटी पॉवरटेक लिमिटेड कंपनी असून, या कंपनीकडे ठेकेदार नेमणे व अन्य कामे नेमण्याची जबाबदारी आहे.
गोविंदकुमार हा सुरक्षा अधिकारी आहे. त्याने युपीएल कंपनीकडे पाच लाख रुपये सुरक्षा ठेव ठेवली होती. ही सुरक्षा ठेव परत देण्यासाठी कंत्राटदाराने रीतसर अर्ज केला होता.
हीच सुरक्षा ठेव देण्यासाठी गोविंदकुमार अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत होता. काहीकमी तरी तडजोड करत एक लाख रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी कंत्राट दाराने पुण्यातील केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाकडे तक्रार केली होती. सीबीआयच्या पथकाने सापळा रचून गोविंदकुमार याला एक लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाने त्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली असून, घराचीही झडती घेण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर