कोविड -१९चा प्रादुर्भाव पाहता मेखळी ग्रामस्थांनी केला पूल बंद

बारामती, दि. २० जुलै २०२०: कोविड -१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात देशांमध्ये राज्यात सर्वात जास्त कोविड -१९ चा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. शहरी भागातून आता कोविड -१९ चा प्रसार ग्रामीण भागाकडे देखील होताना दिसत आहे. बारामती तालुक्यातील मेखळी या गावामध्ये आज पहिला कोविड -१९ रुग्ण आढळून आला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोविड -१९ चा हा पहिला रुग्ण सापडताच सुरक्षाची दखल घेत गावाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील पुल बंद करण्याचा निर्णय आज घेण्यात घेतला. आज सकाळी ११ वाजता मेखळी ग्रामस्थांनी गावाला जोडणारा हा पूल बंद केला आहे.

पुल बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी झाडाच्या फांद्या तसेच लोखंडी बॅरिकेट पुलाला आडवे घातले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुल बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी कोणतीही शासकीय परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे आता इतर प्रवाशांना देखील अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा