राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या आठ वेटलिफ्टिंग खेळाडूंची निवड

मनमाड (जि. नाशिक), ९ डिसेंबर २०२२ : जळगाव जिल्हातील रावेर येथे संपन्न झालेल्या नाशिक, जळगाव, धुळे ,नंदुरबार या चार जिल्ह्यांतील खेळाडूंच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या जयभवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत स्पृहणीय यश संपादन केले.

पूर्वा दीपक मौर्य (सरस्वती विद्यालय), दिव्या उपेंद्र सोनावणे, श्रावणी विजय पुरंदरे,श्रावणी वाल्मीक सोनार, आनंदी विनोद सांगळे (छत्रे विद्यालय), पूजा श्याम वैष्णव व साक्षी भाऊसाहेब वानखेडे (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड), करिष्मा रफिक शाह (न्यू इंग्लिश स्कूल, नगरसुल) या खेळाडूंनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला व कुडाळ, सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या शालेय १७ व १९ वर्षे मुलींच्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी नाशिक विभागीय संघात स्थान मिळविले.

कृष्णा संजय व्यवहारे (गुड शेफर्ड स्कूल), साक्षी राजाराम पवार, आयुष बाळू देवगीर, साहिल यादवराव जाधव, ध्रुव केशव पवार, अथर्व चारुदत्त कारंडे (छत्रे विद्यालय), साक्षी संतोष आहेर (सरस्वती विद्यालय), वैष्णवी अतिष शुक्ला (मध्य रेल्वे विद्यालय) यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला; तसेच अनिरुद्ध देवेंद्र अडसुळे याने चुरशीच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.

यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाडचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवाडकर, पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर. एन. थोरात, उपमुख्याध्यापक एस. व्ही. देशपांडे, पर्यवेक्षिका सौ. एस. एस. पोतदार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा