जालना २० ऑगस्ट २०२४ : जालना महानगर पालिके अंतर्गत दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत स्थापित महिला बचत गटा द्वारे निर्मीत व उत्पादीत कापडी पुनःवापर करता येणारे सॅनिटरी पॅड तयार केले जातात. या पॅड साठी गुजरात व मध्य प्रदेश येथून मोठ्या प्रमाणावर मागणी असून या मागणीअंतर्गत आज महिला बचत गटाने तयार केलेले सॅनिटरी पड्स जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर याच्या उपस्थितीत गुजरात व मध्यप्रदेश कडे पठवण्यात आले आहेत. यावेळी महापालिकेचे कार्यालय अधीक्षक विजय फुलब्रिकर, महिला बालकल्याण विभाग प्रमुख रामेश्वर घोळवे तसेच युनिट मधील महिला स्टाफ याच्या उपस्थितीत ८००० पॅड ची दुसरी ऑर्डर डेहराडून व ओडीसा येथे पाठविण्यात आली.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी