गोल पोस्ट गुन्हा अत्याचारीत महिलेने केले आत्मदहन ; राजस्थानातील प्रकार

अत्याचारीत महिलेने केले आत्मदहन ; राजस्थानातील प्रकार

राजस्थान, ७ जुलै २०२० : भारतात एकिकडे कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय तर दुसरी कडे गुन्हेगारी मध्ये देखील वाढ होताना दिसत आहे.महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.शेजाऱ्याने बलात्कार केल्यानंतर एका तरुणीने स्वतःला पेटवून घेतले आहे. यात तिचा मृत्यू झाला. राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे.

सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बुंदी जिल्ह्यातील गेंदौली परिसरातील चौतरा का खेडा गावात ही धक्कादायक घटना घडली. एका तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर तिने स्वतःला पेटवून घेतले.

पीडित तरुणीच्या शेजाऱ्याने रविवारी तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे व्यथित झालेल्या तरुणीने सोमवारी सकाळी स्वतःला पेटवून घेतले.ज्यामध्ये तिचा दुर्दैवी अंत झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version