गोल पोस्ट आरोग्य संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत – जागतिक आरोग्य संघटना

संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत – जागतिक आरोग्य संघटना

लंडन, ७ जुलै २०२० : सध्या जगात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. कोरोना विषाणूवर अद्याप लस शोधण्यात यश आलेले नाही. लसीबाबत संशोधन सुरु आहे. दरम्यान, हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचा अनेक म्हणजे जवळपास जगभरातील २३९ शास्त्रज्ञांनी केला होता. तसेच याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सुधारित नियम जारी करण्याची मागणी केली होती.कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ. बेनडेट्टा अलेग्रांझी यांनी ही माहिती दिली आहे.

हवेतून पसरणारा संसर्ग दीर्घकाळ हवेत टिकून राहत नाही. त्यामुळे मास्क वापरणे आणि एकमेकांपासून १ मीटरचे अंतर कायम ठेवावे असे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात सी.एस.आय.आर.चे महासंचालक शेखर मांडे यांनी सांगितले आहे.

भारतीय प्रशासना समोर दुहेरी संकट

भारतात सध्या पावसाळा सुरु झाला आसून कोरोना बरोबर अनेक आजार डोकी वर काढणार आणि प्रशासनाला यामधे दुहेरी संकटांना सामोरे जावे लागणार आहे.ज्या मुळे भारतातील प्रशासनाने देखील सर्व नागरिकांना पौष्टीक आहार घ्यायला तसेच सुरक्षित राहायला सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version