धगधगत्या मणिपूरमध्ये ईडी-सीबीआयचे अधिकारी पाठवा, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा

मुंबई १९ जून २०२३: मणिपूर येथे मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरू असुन हा हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्र सरकराकडून प्रयत्न केले जातायत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी, मणिपूर येथे सुरू असलेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी ईडी-सीबीआयचे अधिकारी कारवाईसाठी मणिपूरमध्ये पाठवावेत, ते तिकडे जातायत का बघा आणि गेले तर परत येतायत का बघा, तिकडे दंगेखोर जाळून टाकतील त्यांना. मणिपूर मध्ये लोक अमित शाह यांनाही जुमानत नाहीत असा घणाघात करत, अमित शाह यांनी तेथील शांततेसाठी काय केले? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या महाशिबीरामध्ये बोलत होते.
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्यावरून टीका करताना, तुमच्या सत्तेची मस्ती आणि फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही, आणि एवढीच मस्ती असेल तर ती मणिपूरमध्ये पाठवा असेही ठाकरे म्हणाले. मोदी अमेरिकेत चालले आहेत, परंतु मणिपूरला जायला तयार नाहीत. अमेरिकेत जाऊन तुम्ही विकत घेतलेल्या लोकांच्या गर्दीसमोर तुमचे ज्ञान पाजळणार, अशी जळजळीत टीका ठाकरे यांनी केलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा