जेष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

कोल्हापूर, २४ सप्टेंबर २०२० : मराठी चित्रपटांत अविस्मरणीय भूमिका साकार करण्याऱ्या जेष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय ८४ होते. सरोजताई यांना पहिल्या पासूनच अभिनयाची अत्यंत आवड होती.

सुरुवातीला वेगळं व्हायचय मला,मुंबईची माणसं,प्रेम तुझा रंग कसा,अश्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या. त्यानंतर बाई मी भोळी, कुंकवाचा करंडा, जोतिबाचा नवस, सून लाडकी या घरची, कौल दे खंडेराया, एकटा जीव सदाशिव, सोयरिक, अष्टविनायक, भिंगरी, सावज,सहकार सम्राट, भुजंग, तोतया आमदार ,धुमधडका, लेक चालली सासरला, कुलस्वामिनी अंबाबाई, इरसाल कार्टी, दे दणादण, बळी राजाचे राज्य येऊ दे,अश्या अनेक मराठी चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे २००६ साली चित्रकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा