ज्येष्ठ नागरिकांनी अनुभवले विधानसभेचे कामकाज एक अविस्मरणीय भेट!

Democracy in Action, Seniors Visit the Legislative Assembly
ज्येष्ठ नागरिकांनी अनुभवले विधानसभेचे कामकाज;

Democracy in Action, Seniors Visit the Legislative Assembly: प्राधिकरणातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबईतील विधानभवन भेट हा एक संस्मरणीय अनुभव ठरला आहे. प्राधिकरणातील ज्येष्ठ नागरिक संघातील ५५ सदस्यांनी नुकतीच विधानभवनाला भेट दिली आणि पावसाळी अधिवेशनातील विधानसभेचे कामकाज प्रत्यक्षात अनुभवले. विधानसभेचे कामकाज कसे चालते, हे सर्वसामान्यतः वर्तमानपत्रे, सोशल मीडिया किंवा दूरदर्शनवरून कळते. मात्र, प्रत्यक्ष कामकाज पाहण्याची उत्सुकता अनेकांना असते. लक्षवेधी म्हणजे काय, तारांकित प्रश्न कसे असतात, चर्चा कशा पद्धतीने होते, मंत्री उत्तरे कशी देतात, गोंधळ कसा होतो आणि विधानसभा अध्यक्ष परिस्थिती कशी हाताळतात, या सर्व गोष्टींबद्दल नागरिकांना नेहमीच कुतूहल असते. हीच जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणातील या ज्येष्ठ नागरिक सदस्यांनी मुंबई गाठली.

लोकप्रतिनिधींशी साधला संवाद;

एक अविस्मरणीय भेट;

या भेटीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांना अनेक लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री गिरीश महाजन, आमदार जयंत पाटील, महेश लांडगे आणि सुनील शेळके यांचा समावेश होता. ज्येष्ठांनी आपले महत्त्वाचे प्रश्न आणि समस्या या लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या. यामध्ये आरोग्य वैद्यकीय सेवा, सुरक्षितता, तक्रार निवारण, आणि घरांशी संबंधित समस्या या विषयांवर चर्चा झाली. माजी नगरसेवक राजू मिसाळ यांनी या संपूर्ण भेटीचे उत्कृष्ट संयोजन केले. या भेटीमुळे ज्येष्ठ नागरिकांना विधानसभा कामकाजाची सखोल माहिती मिळाली आणि लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधता आला.

भेटीचा अनुभव ठरला अविस्मरणीय;
या भेटीचा अनुभव अनोखा आणि अविस्मरणीय असल्याचे उपस्थितांनी सांगितले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता धामणस्कर यांनी या भेटीबद्दल बोलताना, “या भेटीमुळे ज्येष्ठांना आपले हक्क व कर्तव्ये यांची जाणीव झाली. असे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले. हा अनुभव केवळ एक भेट नसून, ज्येष्ठांसाठी एक ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी क्षण ठरला, ज्यामुळे त्यांना लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याची जाणीव झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे