जेष्ठ साहित्यिक उत्तम तुपे यांचे निधन.

पुणे, २६ एप्रिल २०२०: जेष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात सकाळी आठच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. सातारा जिह्यातील खटाव तालुक्यातील एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. उत्तम तुपे हे एक उत्तम लेखक आणि कवी होते .

उत्तम तुपे यांनी शंभर लघुकथा व अनेक कांदब-या लिहिलेल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांपैकी एकावर यशस्वी नाटक व चित्रपट बनवले गेले आहे. तुपे हे जातीव्यवस्थेचे सामाजिक हाल व देवदासी यांमुद्यांवर लिहीत होते. ‘झुलवा’ ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी, ह्याच कांदबरी वरून चेतन दातार यांनी नाटक लिहिले.
‘काट्यावरची पोटं’ हे त्यांचे आत्मचरित्र गाजलेले आहे.

इतर लेखकांनी तुपे यांना ‘प्रख्यात सबबोरीएंट लेखक’ म्हटले आहे. उत्तम तुपे यांनी लिहिलेली पुस्तके आंदण, ईजाळ, कोबारा, झावळ, चिपाड, भस्म, पिंड, माती आणि माणसं इत्यादी आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा