विधानपरिषद आमदारपदी ज्येष्ठ पञकार एस. एम. देशमुख यांना नियुक्ती करण्याची मागणी

पुरंदर, दि. १९ जून २०२०: मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख (सर) यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून निवड करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मराठी पञकार परिषद व पुणे जिल्हा पञकार संघ व पुरंदर,भोर पत्रकार शभाच्यावतीने बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिले.

सुळे यांच्या समवेत आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, जेष्ठ नेते सुदामआप्पा इंगळे, शामकांत भिंताडे, हेमंतकुमार माहूरकर, पीडीसी बँकेचे संचालक प्रा.डाँ.दिगंबर दुर्गाडे, पुणे जि.प.सदस्य दत्ताञय झुरंगे, निमंञित सदस्य शिवाजी पोमण, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, महिला अध्यक्षा गौरीताई कुंजीर, अँड.कलाताई फडतरे आदीसह काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनप्रसंगी मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक सुनील जगताप, परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार, उपाध्यक्ष सुर्यकांत किंद्रे, जिल्हा प्रतिनिधी बी.एम.काळे, चंद्रकांत जाधव, प्रदिप जगताप, भोर तालुका पञकार संघ अध्यक्ष सारंग शेटे, हवेली तालुका पञकार संघ सचिव अमोल भोसले, विजय तुपे, पुरंदर तालुका पञकार संघ उपाध्यक्ष राहुल शिंदे, अमोल बनकर, सचिव योगेश कामथे, सहसचिव वामन गायकवाड, संघटक भरत निगडे, ए.टी.माने, हनुमंत वाघले, योगेश खुटवड आदी उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून निवड करण्यात यावे यासाठी राज्यभर सर्वच पञकार आपल्यापरीने सर्वोतोपरी योगदान देत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांचा कोरोना पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका दौरा होता. यावेळी त्यांना मराठी पञकार परिषद, पुणे जिल्हा पञकार संघ, पुरंदर, भोर, हवेली तालुका पदाधिकारी यांनी भेट घेवून निवेदन दिले. एस.एम.देशमुख यांनी पञकार व पञकारांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी घेतलेले कष्ट, पञकार हितासाठी केलेले प्रयत्नपुर्वक योगदान यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पञकार त्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. त्यांना राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून विधानपरिषदेवर नियुक्त करावी अशी मागणी पञकार पदाधिकारी यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.

यावेळी खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, एस. एम. देशमुख यांचे पञकारीता क्षेञातील योगदान महाराष्ट्राला ज्ञात आहे. लोकनेते शरद पवार साहेब यांच्याशी बोलून चर्चा करण्याचे आश्वासन पञकार पदाधिकारी यांना दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा