वाकड मध्ये “वेदांता” सोसायटीमध्येच सुरू केला विलगिकरण कक्ष.

पुणे, दि.२७जुलै २०२०: शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच येथे रुग्णालयांत बेडची संख्याही कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर वाकड येथील एका सोसायटीने आदर्श निर्माण केला आहे.

या सोसायटीमधील जवळपास सहा नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी अनेक अडचणींचा सामना या सोसायटी धारकांना करावा लागला होता. त्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या सोसायटीमध्ये ३११ सदनिका असून यामध्ये दोन हजार नागरिक राहतात.

वाकड येथील वेदांता सोसायटीने सोसायटी मध्येच विलगिकरण कक्ष उभारला आहे. या कक्षात डॉक्टर, ऑक्सिजन आणि प्राथमिक तपासण्या अशा सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.

याठिकाणी उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये गॅस शेगडी, ऑक्सिमीटर, थर्मल गन, ऑक्सिजन सिलेंडर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा