पुण्यामध्ये कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी वाढवल्या आणखी सात स्मशानभूमी

पुणे, ४ सप्टेंबर २०२० : पुण्यामध्ये कोरोनाच्या मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अत्यंसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी देखील कमी पडू लागली लागल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वतीने आणखी सात स्मशानभूमीमध्ये कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अगोदर दोनच स्मशानभूमी मध्ये व्यवस्था करण्यात आली होती.

याबाबत महापालिकेचे विद्युत विभाग प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले की, या अगोदर कोरोना मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार कैलास आणि येरवडा या दोन स्मशानभूमींमध्ये करण्यात येत होते. या दोन स्मशानभूमीत २४ तास अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र अजून सात स्मशानभूमींवर सकाळी ८ ते रात्री १२ या कालावधीत मृतदेह दहनाची सोय करण्यात आली आहे.

औंध, पाषाण, कात्रज, धनकवडी, मुंढवा, कोरेगावपार्क आणि बिबवेवाडी या ठिकाणच्या सात स्मशानभूमींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी अन्य मृतांवर २४ तास अंत्यसंस्कार सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कैलास स्मशानभूमी प्रमाणे प्रत्येक दाहिनीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून हॉस्पिटलच्या मागणीनुसार वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे.
त्यामुळे अंत्यसंस्कार करणे अधिक सोयीचे होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा