गोल पोस्ट राष्ट्रीय बिहार मध्ये विषारी दारू पिल्याने सात जणांचा मृत्यू

बिहार मध्ये विषारी दारू पिल्याने सात जणांचा मृत्यू

छपरा, १४ डिसेंबर २०२२ : दारूबंदी असलेल्या बिहारमधील सारण जिल्ह्यातील इसुआपूर पोलीस स्टेशन परिसरात सात जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. विषारी दारू प्यायल्याने पाचही जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्यूला प्रशासन दुजोरा देत नसले तरी, दोन आजारी लोकांवर छापरा सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य पाचही जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटली असून, विजेंद्र राय, हरेंद्र राम, मुकेश शर्मा, कुणाल सिंह, अमित रंजन आणि रामजी साह अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास सुरु असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version