कोरेगाव भीमा येथे साडेसतरा एकर उसाच्या शेतीला आग ; “जळालेल्या ऊस क्षेत्राचा तलाठी वीज वितरण कडून पंचनामा..

कोरेगाव १० ऑक्टोबर २०२० :कोरेगाव भीमा उस जाळीत प्रकरण हे दुर्दैवी असून, विद्युत निरीक्षक स्थळ तपासणी साठी येणार असून स्थळ तपासणी नंतर त्या रोहित्र वरील सर्व पोल वर स्पेसर बसवणे, बॉक्स मधील फुज बदलणे व लूज गाळे ओढून घेण्यात येईल जेणे करून भविष्यात कोणत्याही प्रकारचे अपघात होणार नाही बी. एस. बिराजदार, सहाय्यक अभियंता-वीज वितरण कंपनी, कोरेगाव भीमा यांनी सांगितले आहे.

कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे ढेरंगे वस्तीजवळ, फरशीच्या ओढ्यालगत विजेच्या शॉर्टसक्रिटमुळे उसाच्या शेतास आग लागून तब्बल १७.२० लाखा किंमतीच्या साडे सतरा एकर क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात ऊसाच्या शेतीचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी अतोनात प्रयत्न करत अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. तोपर्यंत मात्र यामध्ये साडे सतरा एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यवाही केली.

सायंकाळच्या वेळी उसाच्या जवळून जाणाऱ्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन आगीच्या ठिणगी उसात पडली वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने लवकरच उग्ररुप धारण केले. यावेळी स्थानिक शेतकरी व परिसरातील लोकांनी तातडीने मदत केल्याने आग बऱ्यापैकी आटोक्यात आली होती. परंतु वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीच्या ठिणग्या इतर ठिकाणच्या उसावर पडत होत्या अखेर पुण्यातील अग्निशामक दलाच्या जवानांनी व लोकांनी एकत्रित पणे उसाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले यावेळी शेताकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने स्थानिक व्यावसायिक सुनील ढेरंगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जेसिबी ने रस्त्यावरील झाडे झुडपे काढले तर वीज वितरणचे महामंडळचे वायरमन पांडुरंग बगाटे यांनी विद्युत पुरवठा बंद केल्याने पुढील अनर्थ टळला

यावेळी ऊस उत्पादक शेतकरी बबुशा घावटे, छबु गव्हाणे, दत्तोबा माळी, सी. डी. फकीर यांच्या शेतातील ऊस बऱ्याच प्रमाणात जळून खाक झाला असून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलातील जवान अभिषेक गोणे, फायरमन प्रसाद जीवडे, चेतन खमसे, महेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर बुधवन, प्रशांत चव्हाण, या जवानांच्या सोबत स्थानिक शेतकरी कचरु ढेरंगे, सोमनाथ घावटे, हेमंत ढेरंगे, हरीचंद्र ढेरंगे, अविनाश ढेरंगे, बाबूशा ढेरंगे, शिवराम शिंगाडे, अश्विन शिंदे, अमन कर्जतकर आदींनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

या शेतकऱ्यांच्या शेतात उसाच्या उभ्या पिकातून वीज वितरण कंपनीच्या तारा तीनही बाजूंनी गेल्या आहेत तसेच वीज तारा खूप खाली उसाच्या शेतात लोंबाळत असून त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याचा पंचनामा तलाठी अश्विनी कोकाटे यांनी केला. तलाठी यांनी याबाबत दिलेली माहितीनुसार एकुन जळालेला ऊस साडेसतरा एकर व त्याची किंमत अठरा लाख रुपये आहे. यामध्ये बाळासाहेबांना राणबा गव्हाणे गट नं.७२० क्षेत्र २ एकर, नुकसान रक्कम-दीड लाख रुपये, दत्तात्रय बबन माळी गट नं. ७१४ क्षेत्र २ एकर नुकसानरक्कम-दीड लाख रुपये, रुकसाना सय्यद गट नंबर ७१२ व कपिल फकीर गट नंबर ७१८ यांचे एकूण दहा एकर क्षेत्र तर नुकसान रक्कम १२ लाख, छबुराव विठोबा गव्हाणे गट नंबर ७२१ क्षेत्र दोन एकर नुकसान दीड लाख रुपये तर हिराबाई पोपट घावटे गट नंबर ७२० क्षेत्र ६० आर नुकसान रक्कम-दीड लाख रुपये आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा