पालघरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, ३ कामगार जखमी

पालघर, ४ जुलै २०२३: पालघरमधील बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. आग लागलेल्या कंपनीचे नाव हिरा पेट्रोलियम असे आहे. या आगीत तीन कामगार भाजले असून त्यांना बोईसरमधील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. सोमवारी रात्री ९.३० वाजता उपनगरीय बोईसरमधील तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात असलेल्या युनिटमध्ये आग लागली. असे अधिकारी वैभव तांडेल यांनी सांगितले.

अधिकारी वैभव तांडेल म्हणाले की, आगीमुळे काही टाक्यांमध्ये स्फोट झाला ज्यामध्ये तेल भरले होते. माहितीनुसार, स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली. या आगीत तीन कर्मचारी भाजले आहेत. मात्र, दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. फुरखान युनिस खान (वय २७), अस्पाक नजर मोहम्मद शेख (वय ३५) आणि काळुदार संतराम वर्मा (वय ५०) असे आगीत जखमी झालेल्यांची नावं आहेत.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, पहाटे दीडच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी, घटनेच्या वेळी युनिटमध्ये कोणतेही उत्पादन कार्य सुरू नव्हते, याचाही तपास केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा