सेक्सनंतर प्रियेसीने ५०० रुपये मागितल्याने प्रियकराने केला खून

28

छत्तीसगड  : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात एका महिलेच्या खूनाचे गुढ उकलले आहे. प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रेयसीने सेक्स नंतर ५०० रुपये मागितल्याने प्रियकराने तिचा खून केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्राम अकरपाली याठिकाणी राहणाऱ्या एका महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह हा तिच्या घरापासून काही अंतरावर शेतात आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करुन तपासाची चक्र फिरवली. तपासा दरम्यान हा खून मयत महिलेच्या प्रियकराने केल्याचे उघड झाले.
मृत महिलेचे आरोपी चंद्र विजय नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी चंद्र विजयला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलीसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.
महिलेचा खून करण्याआधीच दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले होते. त्यानंतर या महिलेने चंद्र विजयकडे ५०० रुपयांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाले होते. याच वादातून त्याने खून केला.

कोरबाचे पोलीस अधीक्षक राहुल देव शर्मा यांनी सांगितले, ५०० रुपयांसाठी हा खून झाला. आरोपीने ५०० रुपये देण्यास नकार दिल्यानंतर या महिलेने त्याच्या नातेवाईकांना आपल्या प्रेमसंबंधाबद्दल सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे चंद्र विजय हा महिलेवर संतापला. त्याने तिला मारहाण करत तिचा गळा आवळला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. तो एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने महिलेची ओळख पटू नेये म्हणून तिच्या चेहरा दगडाने ठेचून काढला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा