मुंबई : देशभरात मांडूळ म्हणजेच दुतोंडी सापाची तस्करी करणाऱ्यांना पकडल्याच्या अनेक घटना नेहमीच घडत असतात. या सापाचा उपयोग कशासाठी केला जातो, असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतो.
मिळालेल्या माहितीनुसार, मांडूळ या सापाचा उपयोग सेक्स पॉवर वाढविण्याच्या औषधासाठी केला जातो, अशी माहिती तस्कारांनी दिली होती.
मांडूळ सापाविषयी तुम्हाला माहिती आहे का?
▪ मांडूळ सापाची किंमत सुमारे आंतरराष्ट्रीय बाजारात 3 करोड रुपयांपर्यंत आहे. एक किलो वजनाचा हा सर्प 1 करोडमध्ये विकला जातो. ▪ इंडोनेशिया, चीन आणि अरब देशात या सापांना मोठी मागणी आहे. ▪ या सर्पाचा उपयोग सेक्स पॉवर वाढविणारे औषध बनविण्यासाठी केला जातो. ▪ तंत्र-मंत्राच्या नावाने इंडोनेशिया, चीन आणि अरब देशामध्ये याचा वापर केला जातो.
▪ तस्करीमुळे या सापाच्या जातीच्या अस्तित्वाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.















































