सेक्स रॅकेटमध्ये दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरातील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टाकलेल्या
छाप्यात रॅकेटमध्ये सामील असलेल्या २ बॉलिवूड अभिनेत्रींना अटक केली आहे.
समतानगर येथील सीनिअर इन्स्पेक्टर राजूबाबू कसबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी मध्यरात्री गोरेगाव पूर्वेतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये छापा मारला. सेक्स रॅकेटप्रकरणी ३२ वर्षीय आणि २६ वर्षीय तरुणींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आला आहे,’ अशी माहिती पोलीस अधिकारी धर्नेंद्र कांबळे यांनी दिली अटकेतील तरुणींपैकी एक जण BIG BOSS मध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाची गर्लफ्रेंड असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा