अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे; नराधमाला अटक

बारामती : शाळेमध्ये निघालेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत तिच्याशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी महादेव भिकाराम परकाळे (वय ४५, रा. अंजनगाव, ता. बारामती) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिसांनी विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.
या घटनेमुळे अंजनगावात खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.
पिडीत अल्पवयीन मुलगी १२ वर्षाची आहे. ती येथील शाळेमध्ये सातवीमध्ये शिक्षण घेते. दि.२३ जानेवारी रोजी ती चुलत बहिणीसह शाळेमध्ये निघाली असताना आरोपी नातूला दुचाकीवर घेवून शाळेकडे निघाला होता. त्याने पिडीतेसह तिच्या दुसऱ्या चुलत बहिणीला बळजबरीने दुचाकीवर बसवले. हात मागे घेत पिडीतेशी लैंगिक चाळे केले. नातूला शाळेत सोडल्यानंतर तिला दुचाकीवर पुढे बसवत तिच्याशी चाळे सुरुच ठेवले.
विद्यालयाजवळ तिला सोडताना तु रोज माझ्या गाडीवर यायचं, घडल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नको, अशी धमकी पिडीतेला दिली. तिची आई घरी आल्यानंतर पिडीता घाबरलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे तिने तिची विचारपूस केली असता पिडीतेने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
दरम्यान या प्रकरणावर गावात पडदा टाकण्यात आला होता. परंतु २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत पिडीतेच्या वडीलांनी हा प्रश्न ग्रामसभेत उपस्थित केला. त्यानंतर गावातील अन्य मुलींशीही अशा प्रकारचा दुर्व्यवहार होवू शकतो, हे लक्षात घेत फिर्याद दाखल करण्यात आली. आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.

पत्रके चिकटवली.. पोस्कोअंतर्गत गुन्हा
दरम्यान या प्रकरणी मच्छिंद्र टिंगरे (पूर्ण नाव, पत्ता नाही) व त्यांचे काही हस्तक यांच्या विरोधात बारामती तालुका पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार अन्य एक गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने सोशल मिडियावरील अकाऊंटवरून अंजनगावात अवघ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४६ वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची पत्रके सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या हस्तकामार्फत पिडीत मुलीचे नाव, पत्ता प्रदर्शित होईल व तिची अोळख उघड होईल अशा पद्धतीने लावली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हवालदार राजेंद्र जाधव यांनी याबाबत फिर्याद दाखल केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा