शहा, महादेवनगर, कांदलगाव आणि पंधारवाडी गावात होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप

इंदापूर, दि.६ जून २०२०: संपूर्ण जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सारे जग वेठीस धरले गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशोदेशीचे शास्त्रज्ञ यावर मात्रा शोधत असतानाच, मनुष्याच्या प्रतिकार शक्तीची वाढ व्हावी, या उद्देशातून आपल्या आयुष मंत्रालयाच्या वतीने सुचवलेल्या आर्सेनिक अल्बम ३०” या होमिओपॅथीक औषधाचे आज माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने, जि. प. सदस्य अभिजीत तांबीले व पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

क्रांतीस्वयंसेवा बहुउद्देशीय संस्था पुणे आणि डॉक्टर भस्मे चॅरिटेबल सोसायटी पुणे यांच्या माध्यमातून या गोळ्यांचे शहा, महादेवनगर, कांदलगाव आणि पंधारवाडी या गावांतून वाटप करण्यात आले.

शहा गावचे रहिवासी व क्रांतीस्वयंसेवा बहुउद्देशीय संस्था पुणेचे अध्यक्ष असणारे डॉ. आमिर इलाही मुलाणी हे शिक्षणासाठी पुण्यात असतात. त्यांच्याच माध्यमातून या गावांतील सर्व कुटुंबीयांना या होमिओपॅथीक औषधाचे वाटप करण्यात आले. गावापासून एवढे लांब असतानाही या संकट काळात मुलाणी यांनी आपल्या गावाशी जुळलेली नाळ अशा पद्धतीने जपली.

याप्रसंगी कांदलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज असणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने शिव छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत प्रविण माने व उपस्थितांनी अभिवादन केले.

या कार्यक्रमा प्रसंगी कांदलगाव सरपंच रवींद्र पाटील, शक्ती पलंगे, विष्णुआबा पाटील, शहागाव सरपंच धनाजी देवकाते, लहू निकम, बाळासाहेब गंगावणे, शंकर इजगुडे, किशोर धाइंजे, शंकर निकम, तात्यासाहेब जाधव ,शिवाजी पांढरे, आगतराव कुंभार, प्रकाश निकम, पांडुरंग कुंभार, दादासाहेब गलांडे, शहाजी कडवळे, उल्हास पाटील, गणेश पाटील, विजय सोनवणे, नीलकंठ भोसले, समाधान राखुंडे, दशरथ बाबर, विठ्ठल राखुंडे, ग्रामसेवक स्वातीताई लोंढे व इतर इतर जेष्ठ नागरिक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा