रफिक शेख आणि कटके महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतून बाहेर

पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोमवारी धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. महाराष्ट्रचा केसरीचे दोन दमदार दावेदार असेलेल्या पैलवानांना पराभवाचा सामना करावा लागला.त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे दोन दावेदार स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बाला रफिक शेखला चितपट करत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने बाजी मारली आहे. तर अभिजीत कटकेला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या मल्लाकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत बाला रफिक शेख हा विजयी ठरला होता. तर अभिजीत कटके वर्ष २०१७-१८चा स्पर्धेचा विजयी पैलवान होता. यावर्षीही दोघांचे स्पर्धेत वर्चस्व असेल असं वाटत होतं मात्र त्यांच्या पराभवाने सगळ्यांचा धक्का बसला आहे.
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अवघ्या सव्वा मिनिटांमध्ये ज्ञानेश्वर जमदाडेने बाला रफिक शेखला चितपट केलं आहे. बाला रफिक शेख हरल्यामुळे तो स्पर्धेबाहेर झाला आहे. बाला रफिक शेख पाठोपाठ अभिजित कटके सुद्धा उपांत्य फेरीत हरल्याची बातमी मिळाल्यानं यंदाच्या स्पर्धेतील हा मोठा फेरबदल मानला जात आहे.
मॅट विभागाच्या अंतिम फेरीत अभिजित कटकेला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या मल्लाकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. सलग चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब मिळवायचा असा निश्चय करुन मॅटवर उतरलेल्या अभिजित कटकेला हर्षवर्धनने ५-२ अशा फरकाने हरवून थरारक विजय आपल्या नावावर नोंदवला आहे.

हर्षवर्धन सदगीर हा अर्जुनवीर काका पवारांचा चेला आहे. पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात तो सराव करत होता. अभिजित कटके आणि बाला रफिक शेख हे दोन्ही मल्ल महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाहेर गेले आहेत त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा यंदा नवा पैलवान उचलणार यात शंकाच नाही.त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत नवीन महाराष्ट्र केसरी मिळणार अशी स्थिती सध्या प्राप्त झाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा