मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर सहा जणांचा शिवाजी पार्कवर शपथविधी पार पडला. मात्र, शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळत आहे.
या शपथविधी सोहळ्यात प्रोटोकाॅलनुसार व्यवस्था करण्यात आली नव्हती. शपथविधी सोहळ्याची व्यवस्था प्रशासनाला करु दिली नाही. त्यामुळे मंचावर अनेक त्रुटी पाहायला मिळाल्या, असे म्हणत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शपथ घेताना आमदारांनी सुरुवातीला आपल्या नेत्यांची नावे घेतली. यावरही भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. भविष्यात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात असे प्रकार घडू नयेत. अशा कृत्यांमुळे सोहळ्याची प्रतिष्ठा खालावते, असं राज्यपालांचं म्हणने आहे.
शपथविधीदरम्यान मंचावर असणाऱ्या अव्यवस्थेवर राज्यपालांना नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत आक्षेप नोंदवला असल्याची माहिती मिळत आहे.