राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मंगळवारी शरद अरविंद बोबडे यांना सरन्यायाधीश आणि रंजन गोगोई यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या वॉरंटवर स्वाक्षरी केली. बोबडे आपल्या न्यायाधीश पदाची शपथ १८ नोव्हेंबरला घेतील.
सध्याचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत असल्याने यांनी १८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठतम न्यायाधीशांना पुढील मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली होती. मुख्या न्यायाधिष निवृत्त होत असताना आपला उत्तराधिकारी पत्राच्या साह्याने घोषित करत असतो या प्रक्रियेनुसार बोबडे यांची नियुक्ती रंजन गोगोई यांनी या आधीच केली होती. याची बातमीही न्युज अनकट ने आपल्याला दिली होती.
रंजन गोगोई, जे भारताचे ४६ वे सरन्यायाधीश आहेत त्यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी शपथ घेतली होती आणि ते १७ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होतील.