राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

दिल्ली, ११ सप्टेंबर २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन काल दिल्लीत पार पडले. या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्य समितीत एकमताने ठराव मंजूर झाला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत पार पडले. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवारांनी उपस्थित सदस्यांना संबोधित केले. शरद पवारांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

शरद पवार हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. सध्या शरद पवार यांच्याकडे देशातील विरोधी पक्षांचा प्रमुख नेता म्हणून पाहिलं जातं. शरद पवारांनी महाराष्ट्रात २०१९ मध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकत्र आणून महाविकास आघाडीचा केलेला प्रयोग देशभर चर्चेचा विषय ठरला होता.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी असावी अशी चर्चा सध्या सुरु आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी इच्छा विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आहे. विरोधी पक्ष निवडणुकीपूर्वी एकजूट होत असताना निवडणूक झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मजबूत असावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात महाराष्ट्राबाहेर निवडणुका लढवण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा