शरद पवारांनी उध्दव ठाकरेंनाच केले बोल्ड

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२२ : मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीत शरद पवार आणि भाजपाची युती झाली. आणि त्यांच्या उमेदवाराचा विजय देखिल झाला. अमोल काळे हे देवेंद्र फडणवीसांचे जवळचे सहकारी निवडून आले यावरून राज्याच्या राजकारणात नेमकं काय शिजतय याचा अंदाज लावला जात असतांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार मोदींना साथ देतील असे वक्तव्य करून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खळबळ उडवून दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले की, शरद पवार कधी गुगली टाकतील आणि कुणाला बाद करतील याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. राजकारणात काहीही अशक्य नाही. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही चांगले खेळाडू आहेत. दोघांनाही त्यांचा खेळ चांगल्या प्रकारे माहित आहे, क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील खेळी पवारांचा मास्टर स्ट्रोक नाही का, असं विचारलं असता आठवले म्हणाले की, ही खेळी म्हणजे राजकीय गुगली आहे. मात्र या निवडणूकीत पवारांनी आपल्या गुगलीने उध्दव ठाकरेंनाच बोल्ड केले. यावरून आठवलेंनी २०२४ च्या निवडणूकीतही मोठा उलटफेर होण्याची शक्यता असल्याचे आठवलेंनी म्हटले आहे. दरम्यान शरद पवार यांनी एनडीएमध्ये यायला हवं. त्यांनी नरेंद्र मोदींसोबत यावे. मी इथे आहे, मग पवारांनी का दूर असावं असा प्रश्न आठवले यांनी यावेळी उपस्थित केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड