राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारांनीच रहावे, भेटून विनंती करणार – प्रफुल्ल पटेल

4

मुंबई, ५ मे २०२३: राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा पक्षाच्या समितीने नामंजूर केला असल्याची माहिती आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पवारांना भेटून विनंती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार निवृत्तीची अशी अचानक घोषणा करतील याची कल्पना नव्हती. सध्याची परिस्थिती पाहता देश राज्य आणि पक्षाला पवार साहेबांची गरज आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पवारांनीच रहावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि निवड निर्णय समिती निमंत्रक प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवारांनी पद सोडू नये अशी कार्यकत्यांची भावना आहे. त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. आज त्यांनी समितीवर जबाबदारी दिली होती. त्या समितीने शरद पवारांचा राजीनामा सर्वानुमते फेटाळला असल्याचे पटेल यांनी सांगितले आहे.

निवड समितीकडून मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये नमुन करण्यात आला आहे की, पवार याचा राजीनामा नामंजूर करून तो फेटाळला आहे. इथून पुढे देखील पवार साहेबच पक्षाचे प्रमुख राहावेत, असे समितीतील सर्व सदस्यांचे मत आहे. आम्ही सर्वजण मिळून शरद पवारांना भेटणार असून, त्यांना आमचा निर्णय सांगू असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा