राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली, राज ठाकरेंचा हल्लाबोल

5

पुणे, ५ जुलै २०२३: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदाबाबत मोठे विधान केलय. महाराष्ट्रातील राजकीय लढाईच्या मागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः असू शकतात, असे मनसे प्रमुखांनी मंगळवारी पुण्यात सांगितले. दुसरीकडे अजित पवार आणि आठ आमदार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याबद्दल राज ठाकरे म्हणाले की, जे झाले ते चुकीचे आहे. राज्यातील मतदारांचा अपमान करण्याचा हा प्रकार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की शरद पवार यांनीच १९७८ मध्ये पहिल्यांदा ‘पुलोद’ (पुरोगामी लोकशाही दल) सरकारचा वापर केला होता. त्यांनीच महाराष्ट्रात हा ट्रेंड सुरू केला. यापूर्वी अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली नव्हती. पवार यांच्यापासून सुरू झालेला हा ट्रेंड त्यांच्यासोबत संपत असल्याचे ठाकरे म्हणाले.

इतकेच नाही तर आज महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामागे खुद्द शरद पवार यांचा हात असू शकतो, असा दावाही मनसे प्रमुखांनी केला. माझ्या समजुतीनुसार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील हे नेते, शरद पवारांच्या संमतीशिवाय ते स्वतः अजित पवारांसोबत कसे जातील? असे राज ठाकरे म्हणाले.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मला राजीनामा द्यायचा असल्याचे सांगितले, मात्र शरद पवार यांची भेट घेऊन निर्णय बदलला. अमोल कोल्हे पेशाने अभिनेता आहे. मोठी गोष्ट म्हणजे रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आठ आमदारांच्या शपथविधीवेळी ते राजभवनात उपस्थित होते. आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे नंतर सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेससाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट आज आपली ताकद दाखवणार आहेत. दोघांनीही बैठकीची तयारी केली आहे. कोणाच्या सभेत आमदारांची संख्या जास्त असेल, यावरून खऱ्या राष्ट्रवादीच्या दाव्याला पुष्टी मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा