शरद पवार आज दिवसभर अन्नत्याग करणार 

मुंबई, २२ सप्टेंबर २०२०: कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्यानं निलंबित झालेले आठ खासदारांनी अन्नत्याग केलाय. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं शरद पवार यांनी जाहीर केलंय. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्यसभेच्या उपसभापतींसह केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही प्रश्न उपस्थित केले.

‘खासदारांच्या निलंबनाचा निर्णय अयोग्य आहे. केवळ भूमिका मांडण्यासाठी खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. अशा पद्धतीनं खासदारांचा मूलभूत अधिकार हिरावणे अयोग्य आहे. त्यामुळं, सदस्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन मी देखील अन्नत्याग करणार’, असे शरद पवारांनी जाहीर केले आहे.

पवार पुढे बोलताना म्हणाले कि…

राज्यसभेत आम्ही मदत केली नाही. प्रफ्फुल पटेल, सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. तसंच काही सदस्य सभागृहात होते. आम्ही सभागृहात विरोधात भूमिका मांडली. पण सभागृहात बोलून दिले जात नव्हते. ‘मी सभागृहात नव्हतो, त्यामुळे शिवसेनेनं सभागृहात काय भूमिका मांडली. याबद्दल मला माहिती नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा