गोल पोस्ट राजकारण शरद पवार यांचा ३, ४तारखेला दिल्ली दौरा

शरद पवार यांचा ३, ४तारखेला दिल्ली दौरा

मुंबई : येत्या ३आणि ४तारखेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दिल्ली दौऱ्यादरम्यान शरद पवार काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी,राहुल गांधी यांची भेट घेणार असून विरोधी पक्षांतील नेत्यांची बैठकही घेणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दिल्ली भेटून मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आता निर्माण होऊ लागली आहेत. याचा आघाडीला किती फायदा होतो हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे शरद पवार यांचा हा दौरा कितपत यशस्वी ठरणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version