वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

पुणे, १५ सप्टेंबर २०२२ : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावर सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मधून पुन्हा महाराष्ट्रात येने अशक्य आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी मदत केली तर त्यांच्या भुमिकेचे आम्ही स्वागत करू. महाराष्ट्रात त्याही पेक्षा मोठा प्रकल्प आणण्याचे आमिष दाखवणे म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं आहे.अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

तसेच शरद पवार पुढे बोलतात की केंद्राची सत्ता हाती असल्याने अनुकूल परिणाम काही राज्यावर होत असतात त्यामध्ये गुजरात आहे, असे बोलत मोदी शहा यांच्या सरकार वर ही निशाणा साधला आहे. महविकास आघाडीने यावर काही निर्णय घेतला नाही, असा आरोप करण्यात येत आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उदय सामंत शिंदे हे आमच्या सरकारच्या वेळेस मंत्री होते, त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करणे योग्य नाही असाही टोला त्यांनी लावला आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प बदल्यात दुसरा प्रकल्प याला काही अर्थ नाही. तसेच तळेगाव हा जो स्पॉट आहे, त्याच्या आजूबाजूला चाकण आणि रांजणगाव आहे. ऑटोमोबाईल साठी अनुकूल आहे. इथ जर हा प्रकल्प असता तर कंपनीला फायदेशीर ठरले असते त्यामुळे तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. पण आत्ता तो प्रकल्प गुजरात मध्ये गेला आहे. त्यामुळे आता या विषयावर चर्चा करण्याला काही अर्थ नाही. यानंतर जास्तीत जास्त प्रकल्प राज्यात कसे येतील यावर सरकारने लक्ष द्यावं असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा