साहित्य संमेलानातील शाई फेकीच्या घटनेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

4

मुंबई, 6 डिसेंबर 2021: नाशिकमध्ये गिरीश कुबेरांवर शाईफेक झाल्यानंतर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. भाजच्या काही नेत्यांनी याचं समर्थन केलं आहे तर काही नेत्यांनी शाईफेकीचा प्रकार अयोग्य असल्याचं म्हटलं आहे, पण महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखानाचाही निषेध असं फडणवीस म्हणालेत. तर इतर राजकीय पक्षांकडूनही यावर जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर शरद पवारांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलीय.

शरद पवार म्हणाली की, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या पुस्तकासंदर्भाचा विवाद गेल्या पाच-सहा महिन्यांपासून चालू आहे. हे पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे. लोकशाहीत अधिकार असल्याने आपली मते व्यक्त करण्याची भूमिका घेऊ शकतात. त्या मतांचा विरोध करणारे दुसरेही घटक असू शकतात.

ही घटना नींदनीय

देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्वीकारले आहे. आपल्या मनाविरुद्ध एखाद्या लेखकाने एखादी गोष्ट लिहिली तर त्या लेखकावर व्यक्तिगत हल्ला करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. आम्ही त्याचा पुरस्कार कधीही करणार नाही. ही घटना नींदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही.

विशेषतः तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नावाने ज्या परिसरामध्ये साहित्य संमेलनाचा सोहळा इतक्या उत्साहाने आणि उत्तम रीतीने सुरू आहे, अशा परिसराजवळ हा प्रकार घडला. कुठेही घडणं चुकीचं आहे. पण इथे घडणं आणखी चुकीचं आहे.

काय लिहिलं कुबेर यांनी

गिरीश कुबेर लिहतात, ”छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली, तसेच ”छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांनाही ठार केले, त्यातील काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मडळातील होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेली चांगली फळी नष्ट झाली. याची किंमत नंतर छत्रपती संभाजी महाराजांना मोजावी लागली” असंही ते लिहतात. या मजकूरावरून कुबेर यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा