शारदा कृषी वाहिनी करतेय जनजागृती पर कार्यक्रमाचं आयोजन

बारामती, १६ डिसेंबर २०२०: बारामती ९०. ८ एफ एम रेडिओ शारदा कृषी वाहिनी, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि इंडिया मीडिया लिटरेसी नेटवर्क डेटा लीड्स इंटरन्यूज तसेच स्मार्ट नवी दिल्ली यांच्या सयुंक्त विद्यमानं फॅक्ट शाळा या जनजागृती पर कार्यक्रमाचं आयोजन माळेगांव येथील अंगणवाडी मध्ये शासनाचे सर्व नियम पाळत पार पडला. यावेळी माळेगांव येथील अंगणवाडी सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सध्या सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्स अॅप, फेसबूक व इंटरनेटचा वापर वाढल्यामुळं अनेक फायदे होताना दिसून येत असले तरी त्याचे तोटे देखील समोर येत आहेत. यामध्ये ऑनलाइन व्यवहार केल्यामुळं अनेक लोकांची फसवणूक करून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसंच अनेक वेळा खोट्या बातम्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी सोशल मीडिया वरील प्रसारित होणार्‍या माहिती मधील सत्यता कशी पडताळावी, याविषयी ‘फॅक्ट शाळा’ या कार्यक्रमामध्ये शारदा कृषि वाहिनीच्या निवेदिका अनिता जाधव यांनी उपस्थित अंगणवाडी स्वयंसेविकाना माळेगाव येथे मार्गदर्शन केलं.

उपस्थित महिलांनी सोशल मीडियावर कशी फसवणूक केली जाते याविषयी अनेक उदाहरणं दिली व फॅक्ट शाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. माळेगाव खुर्द, पिंपळी, डोर्लेवाडी, पणदारे, सांगावी यागावात कार्यक्रम घेणार असल्याचं सांगितलौ. या प्रसंगी बोलताना शुभदा भिलारे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी रेडिओ शारदा कृषी वाहिनीचे प्रमुख सुनील शिरशिकर यांनी रेडीओ ची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील बुधवाले, विशाल चव्हाण तसेच अंगणवाडी कर्मचारी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा कृषी वाहिनीच्या निवेदिका रोहिणी कुचेकर यांनी केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा