शाररिक संबंधामुळे डेंग्यू

नवी दिल्ली : आज डेंग्यूने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तस पाहिले तर मेडिकल सायन्सनुसार डेंग्यू हा केवळ मच्छर चावल्यानेच होतो. मात्र स्पेनमध्ये असे एक प्रकरण समोर आले आहे की, ते एकूण तुम्हाला धक्का बसेल. स्पेनमधील एका रुग्णाला मच्छर चावल्याने नाही तर शारीरिक संबंध ठेवल्याने डेंग्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक महिती घेण्याचा प्रयत्न केला असता, स्पेनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दावा केला आहे की, शारिरिक संबंधांमुळेच या व्यक्तीला डेंग्यू झाला आहे. जगातील हा पहिलाच असा रुग्ण आहे. ज्याला मच्छरामुळे नाही तर शारिरिक संबंधांमुळे डेंग्यू झाला आहे.

मद्रिदमध्ये राहणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीचे देखील म्हणणे आहे की, समलैंगिक संबंधामुळे डेंग्यू झाला आहे. मद्रिद जिल्हा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे प्रमुख सुजाना जीमेंज यांचे म्हणणे आहे की, मेल पार्टनरला क्यूबा ट्रिप दरम्यान डेंग्यू झाला होता.त्यामुळे संबंधित रुग्णाला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा