शशी कपूरचा नातू जहान कपूर ‘फराज’ या चित्रपटातून पदार्पण करणार

पुणे, १८ जानेवारी २०२३ : अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जहान दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ‘फराज’ या चित्रपटातून दमदार एन्ट्री करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, चाहत्यांना तो खूप आवडला आहे. या चित्रपटात परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ता. ३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

गेल्या काही काळापासून मनोरंजन क्षेत्रात चर्चेत असलेल्या ‘फराज’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, ट्रेलरमधून प्रेक्षकांना दहशतवादाने तरुणांचे भडकवलेल्या विचाराबरोबरच दहशतीचा थरार अनुभवता येणार आहे.

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले असून भूषण कुमार, अनुभव सिन्हा, साक्षी भट्ट, साहिल सहगल आणि मजहिर मंदसौरवाला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर जहान कपूर आणि आदित्य रावल यांच्याशिवाय या चित्रपटात जुही बब्बर, आमिर अली, सचिन लालवानी, पलक लालवानी आणि रेशम सहानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा