शस्त्रक्रिया झालेल्या सर्व महिलांना नातेवाईकांसह ठेवले एकत्र

बीड, दि.२४ मे २०२० : बीड जिल्ह्यातील शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शनिवारी (दि.२३) रोजी झालेल्या महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर १७ ते १८ महिलांना नातेवाईकांसह एका हॉलमध्ये थांबवण्यात आले होते. त्यामुळे कोरोना किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती होती. रुग्णालयाच्या या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शनिवारी १८ महिलांवर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर या १८ महिलांना थांबवण्यात आलेल्या हॉलमध्ये धक्कादायक परिस्थिती होती. सोशल डिस्टन्स पाळता येईल, एवढी जागा नसल्याने महिला जागा मिळेल तिथे आराम करत होत्या.
त्याच हॉलमध्ये या महिलांचे नातेवाईकही बसले होते. तसेच हॉलमध्ये उकाडा असह्य होत होता. शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोठी जागा असताना एकाच हॉलमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना का थांबविण्यात आले ,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा