शौविक चक्रवर्ती आणि मिरंडा यांना ड्रग्ज व्यवहार प्रकरणी अटक

मुंबई, ५ सप्टेंबर २०२०: अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी अमली पदार्थांच्या संबंधात एनसीबीने मोठी कारवाई करत रियाचा भाऊ शौविक याला अटक केली आहे. सॅम्युअल मिरांडा यालाही अटक करण्यात आली आहे. जरी यापूर्वी एनसीबीने म्हटले होते की आज कोणालाही अटक होणार नाही तरी देखील सायंकाळी उशिरा एनसीबीने दीर्घ चौकशी करून त्याला अटक केले. शुक्रवारी सकाळी एनसीबीने त्याच्या घरावर छापा टाकला होता आणि ते चौकशीसाठी शौविकला सोबत घेऊन गेले.

रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सैमुअल मिरांडा यांना एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ सी, २८ आणि २९ नुसार अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, शौविक हा सूत्रधार होता ज्याने केवळ सुशांतसाठीच नाही तर बॉलिवूडच्या इतर काही स्टार्ससाठीही ड्रग्सची व्यवस्था केली आहे .

यापूर्वी एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा ​​म्हणाले होते की लवकरच शौविकला अटक केली जाऊ शकते. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आज सकाळपासूनच अटकेत होता. रियाच्या घरावर छापा टाकल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम शौविक चक्रवर्ती याला आपल्यासोबत घेऊन गेली. ड्रग पेडलर सोबत शौविकची चौकशी केली.

सुशांत प्रकरणात एनसीबी सकाळपासूनच कारवाईत दिसत होती. पहिल्यांदाच रियाच्या घरावर छापा टाकण्यासाठी तपासणी पथक दाखल झाले. प्रथमच रियाच्या संपूर्ण घराची झडती घेण्यात आली. घरात पहिल्यांदा चौकशी केली गेली. प्रथमच, तपास यंत्रणेने रियाच्या कुटुंबातील सदस्याला घराबाहेर काढले. तो सदस्य रियाचा भाऊ शौविक होता. तेव्हापासून अटकेची तलवार त्याच्या डोक्यावर टांगली गेली होती.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो टिमने सुशांत प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनबाबत ड्रग पेडलर्स बासित आणि जैद यांच्यासह शौविक याच्याकडे चौकशी केली. सगळ्यांना एकत्र बसवून प्रश्न आणि प्रत्येकाकडून उत्तरे घेतली गेली. सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडाचीही चौकशी केली गेली.

तीन तासापेक्षा जास्त छापेमारीनंतर एनसीबीच्या पथकाने शौविक आणि मिरांडाला बरोबर घेतले. रियाच्या घरातून एनसीबी टीमने शौविकचा लॅपटॉप तसेच रियाचा जुना मोबाईल घेतला. यापूर्वी एनसीबीने रियाच्या संपूर्ण घराचा ३ तास शोध घेतला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस तपासले.

एनसीबी ड्रग्ज कनेक्शनमधील ठोस पुरावे शोधत होते. रियाच्या चॅटिंगमध्ये केवळ शौविकचे नाव समोर आले नाही तर जैद आणि बासित यांनी त्याच्याशी असलेल्या दुव्याबद्दलही कळले. ही साक्ष शौविकला अटक करण्यासाठी पुरेशी होती. एनडीपीएस कायद्याच्या ६७ नारकोटिक्स ब्युरो अंतर्गत शौविकला अटक करण्यात आली होती. आता रियावरील तपास कडक करण्यात आला आहे. लवकरच तिच्या अटकेबाबतही कयास आहेत. एनसीबी लवकरच रिया चक्रवर्ती हिला समन्स पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा