मुंबई: अमेरिका- इराणमधील तणावाचा मुंबई शेअर मार्केटवर एवढा परिणाम झाल्याचे पहायला मिळाले की, यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे एकाच दिवसात तब्बल ९३३३( १.३अब्ज डॉलर) चे नुकसान झाले आहे. शेअर बाजारात घट झाल्याने त्यांची संपत्ती ५७.६अब्ज डॉलर झाली आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना २.९७लाख कोटींचा फटका बसला आहे.
तसेच शेअर बाजाराचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे “वॉरेन बफे” म्हणजे राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजार कोसळल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये १३६ कोटी रुपयांचा ( $१९मिलियन) डॉलरचा फटका बसला आहे. वॉरेन बफे हे जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांना हे नुकसान झाल्याने कुणीही या मार्केटला चॅलेंज करू शकत नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे.