बुलढाणा, ४ मे २०२३ : शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानद्वारे संचलित ‘आनंदसागर’ हे अध्यात्मिक केंद्र काही कारणांमुळे तब्बल पाच वर्षांपासून पूर्णतः बंद ठेवले होते. शेगावात गजानन महाराजांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी दरदिवशी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची आनंदसागर बंद असल्याने मोठी निराशा झाली होती. सुमारे ३५० एकर क्षेत्रावर विकसित क नाहीेलेला विस्तीर्ण सर्वांगसुंदर आनंदसागर पूर्वरत प्रवेशासाठी खुला करावा ही लाखो भाविकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.
श्री गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून हा आनंदसागर भाविकांसाठी खुला करण्याची मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार गुरुवार दि. ४ मे २०२३ च्या सकाळी पासून आनंदसागर अध्यात्मिक केंद्रांचा काही भाग भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. हा प्रवेश सेवार्ध नि:शुल्क आहे. वेळ दरदिवशी सकाळी १० ते दुपारी ४ अशी असून सायंकाळी पाच वाजता अध्यात्मिक केंद्र परिसर बंद होईल.
याबाबत संस्थानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तांनी सुचनाफलकाद्वारे सुचित केले आहे. अध्यात्मिक मन:शांतीची अनुभूती देणारा, नयनरम्य आनंदसागर चा काही भाग आजपासून प्रवेशासाठी उपलब्ध होणे ही शेगावात दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. शेगाव परिसरातील वर्दळही यामुळे वाढणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर