शेतकऱ्याच्या मुलीची कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडंट पदासाठी निवड

माढा: पल्लवीचे वडील शेतकरी आहेत. या परीक्षेत पास झाल्याने पल्लवी आणि तिच्या कुटुंबाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या भारताच्या सैन्यदलामध्ये भोगेवाडी गावातील अनेक तरूण कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील माढा तालुक्यातील हे छोटेशे गाव आहे. पल्लवी काळे ही भोगेवाडीतील नौदलातील जाणारी पहिली महिला अधिकारी बनली आहे.
भोगेवाडीमध्ये राहणारी या पल्लवी काळे ची भारताच्या नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडंट पदासाठी निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शनकडून घेण्यात परीक्षेत पल्लवीने दुसरा क्रमांक मिळवला आहे. पल्लवी काळेचं शालेय शीक्षण भोगेवाडीच्या जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये झालं आहे आणि ५-१२ चे शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा इथे झालं आहे. पल्लवीचने मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी पुण्यामधील सिंहगड इंस्टिट्युड इथे झालं आहे. पुण्यातच पल्लवी स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा