गोल पोस्ट कृषी शेतकऱ्याला कर्जमाफीसह शून्य व्याजदराने कर्जाची गरज: शरद पवार

शेतकऱ्याला कर्जमाफीसह शून्य व्याजदराने कर्जाची गरज: शरद पवार

नागपूर: सोमवारपासून दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरु आहे. तेव्हा केंद्रीय कृषि मंत्रालयाशी बोलून, शेतकऱ्यांना मदत कशी मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत, शिवाय अधिवेशन काळात सर्व जण भेटतात, त्यामुळे ही मदत मिळवून देणे सोयीचे होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

पवार पुढे म्हणाले, केंद्राच्या कृषि विभागात जर मदत मिळणार नसेल, तर या खात्यात मी काम केले आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय कुठून होतो, तो कसा महत्वाचा आहे, हे मला माहित आहे, त्या स्तरावर मी प्रयत्न करणार आहे.
शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. शेतात नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना पिक कर्जमाफी द्या? अशी मागणी आम्ही करणार आहोत.
कर्जमाफीतर द्यावीच पण, या वर्षाचं पिक गेले, पण पुढील वर्षासाठी शून्य व्याजावर किंवा कमी व्याजावर शेती करण्यासाठी भांडवल म्हणून पिककर्ज मिळेल द्या, अशी मागणी देखील आपली असणार आहे, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं शरद पवारांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version