शेवगाव येथील जलवाहिनीला गळती, हजारो लिटर पाणी वाया

शेवगाव, दि.१ जून २०२०: शेवगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहीनीला जागोजागी गळती लागल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. तसेच हे पाणी बंद केल्यावर नाल्यातील पाणी या मुख्य जलवाहिनीत जावून साचते. त्यामुळे नळावाटेही हेच पाणी नागरीकांना पिण्यासाठी मिळत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगरपरिषदेच्या दुर्लक्षित कारभारामुळे असे दुर्गंधीयुक्त व अशुध्द पाणी पिण्याची वेळ नागरीकांवर आली आहे. शेवगाव, पाथर्डी व ५४ गावांना जायकवाडी जलायशयातून पाणी पुरवठा करण्यात येतो. शेवगाव शहरातील चार साठवण टाक्यातून ते शहरातील प्रत्येक प्रभागात सो़डण्यात येते.

यंदा धरणात मुबलक पाणी असूनही ऐन उन्हाळ्यातील पाणी टंचाईच्या काळात मात्र गेल्या दोन महिन्यापासून दहा ते बारा दिवसातून एकदा शहरवासियांना पाणी मिळते.
शहरातील अनेक जलवाहिन्या या नाल्यातून गेलेल्या आहेत.

सध्या पावसाळ्यापूर्वीच्या गटार स्वच्छतेची कामे सुरु आहेत. क्रांती चौकातील गटारीचे काम सुरु असतांना त्यामधून गेलेल्या नळ कनेक्शनचे पाईप फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले.
फुटलेल्या पाईपमधून गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी जलवाहिनीत जावून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे नगरपरिषदेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा