पार्टी करणाऱ्या ११ डॉक्टरांवर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

शिरुर , दि. २० जुलै २०२० : शिरूर तालुक्यात शासकीय नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रकारात वाढ झालेली असून एका मागून एक गुन्हे दाखल होत आहेत. यातच पुन्हा शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तळेगाव ढमढेरे येथे एका पार्टीवर कारवाई करत तब्बल अकरा डॉक्टरांसह दोन हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील भीमाशेत वस्ती जवळ रात्री एका हॉटेलमध्ये पाच पेक्षा अधिक डॉक्टरांनी एकत्र येत गर्दी जमवली होती. शासकीय नियमानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असताना देखील काही लोक ओली व सुखी पार्टी करत असल्याची माहिती शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली.

त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस शिपाई विकास मोरे, यांसह आदींनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता. त्यावेळी पोलीस आल्याची माहिती मिळताच सर्व डॉक्टर पळून जाऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता शिक्रापूर, सणसवाडी परिसरातील तब्बल अकरा डॉक्टरांनी एकत्र येत ओली सुकी पार्टी करत असल्याचे आढळून आले. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विकास मोरे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर सणसवाडी परिसरातील तब्बल अकरा डॉक्टरांसह दोन हॉटेलच्या मालकांवर रात्री गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापुरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा