शिक्षण सेवक योजना रद्द करा; शिक्षकांचा एल्गार!

“शिक्षक हा सेवक नसून समाजाचा मार्गदर्शक आहे,” असे म्हणत युवा विद्यार्थी असोसिएशन ने शिक्षण सेवक योजना तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. या योजनेमुळे हजारो शिक्षकांना तुटपुंज्या मानधनावर आणि असुरक्षित स्थितीत काम करावे लागत आहे.

या तीन वर्षांच्या करारावर काम करण्याची सक्ती शिक्षकांसाठी अपमानास्पद असल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी केला आहे. सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळी अधिवेशनादरम्यान तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. शिक्षकांना पूर्ण वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संघटनेने म्हटले आहे की शिक्षकांचे मनोधैर्य खचल्यास शिक्षणाची गुणवत्ता खालावेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे