शिल्पा मेडिकेअर तयार करणार स्पुतनिक-व्ही लस, शेअर मध्ये १२ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली, १८ मे २०२१: देशातील लस उत्पादनास चालना देण्यासाठी अनेक पावलं उचलली जात आहेत.  या मालिकेत भारतीय औषध कंपनी शिल्पा मेडिकेअरने डॉ. रेड्डीज लॅबबरोबर  स्पुतनिक-व्ही लस तयार करण्याचा करार केलाय.
  शिल्पा मेडिकेयर कंपनीने सोमवारी शेअर बाजाराला सांगितलं की रशियाच्या कोविड -१९ स्पुतनिक-व्ही ही लस तयार करण्यासाठी त्यांच्या शाखेने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी’शी  करार केलाय.  त्याअंतर्गत शिल्पा कंपनीने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज’शी संपूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी शिल्पा बायोलॉजिक्स प्रायव्हेट लिमिटेड (एसबीपीएल) मार्फत तीन वर्षांचे बंधन करार केले आहे, ज्याअंतर्गत कंपनीनं कर्नाटकच्या धारवाडमध्ये त्यांचे एकात्मिक जीवशास्त्र अनुसंधान व विकास आणि उत्पादन केंद्राच्या माध्यमातून  लस तयार करणार आहे व त्याचे वितरण केलं जाईल.
  डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज’च्या प्रयोगशाळांमध्ये रशियाच्या लसींचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, असं फार्मा कंपनी शिल्पा मेडिकेअरने सांगितलं.  त्याअंतर्गत एका वर्षात सुमारे पाच कोटी लस करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.  शिल्पा मेडिकेअर कंपनी ने सांगितलं की डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुतनिक-व्ही चे तंत्रज्ञान एसबीपीएलमध्ये हस्तांतरित करतील.
  जर स्पुतनिक-व्ही ची निर्मिती भारतात केली गेली तर त्याच्या दरात थोडीशी कपात होऊ शकते.  करारानुसार या रशियन लसीच्या एकूण १५ कोटी लस देशभरात तयार केल्या जातील. या बातमीनंतर सोमवारी शिल्पा मेडिकेअरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली.  ट्रेडिंग संपल्यानंतर शिल्पा मेडिकेअरचे शेअर्स एनएसईत सुमारे १२ टक्क्यांनी वाढून ५०९ रुपयांवर बंद झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा