शिंदे सरकारची संभाव्य यादी आली समोर, नितेश राणे-दरेकरांना मंत्रीपदाची लॉटरी?

मुंबई, ०४ ऑगस्ट २०२२: शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. पण, आता पाच ऑगस्टला विस्तार होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारमध्ये कोण-कोणाची वर्णी लागणार यांची संभाव्य यादी समोर आली आहे‌.

शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार , संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे‌. जे शिवसेनेमध्ये मंत्री होते त्यांनाच मंत्रीपद दिले जात आहे. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रविण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवातीला १५ ते १६ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजप गृह खातं स्वतः कडे ठेवणार आहे. ६०-४० असा मंत्रीमंडळ विस्ताराचा फॉर्म्यूला ठरला आहे. या विस्तारात शिवसेनेतील शिंदे गटाच्या अनेक माजी मंत्र्यांना वेट अँड वॉचवर ठवणार.

मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. या शपथविधीला केंद्रातून भाजप नेते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा