शिंदे-राणे-सोनोवाल दिल्लीसाठी रवाना; जेडीयू करणार भाजप हाय कमांडशी बोलणी

नवी दिल्ली, ७ जुलै २०२१: येत्या एक-दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात. मात्र, आधीपासूनच हालचालींना वेग आलाय. यादरम्यान इच्छुक असलेल्या संभाव्य मंत्र्यांची नावं देखील समोर येत आहेत. जसे मध्य प्रदेशमधील भाजप नेते ज्योतिरादित्य यांना अचानक दिल्लीहून फोन आला. महाराष्ट्रातील नारायण राणे आणि उत्तर प्रदेशमधील कौशांबीचे खासदार विनोद सोनकर हेही दिल्लीला पोहोचतील. सरबानंद सोनोवाल आसामहून दिल्लीला पोहोचले आहेत.

एलजेपीचे विभाजन करणारे चिराग पासवान यांचे काका पशुपती नाथ पारस पाटण्यात उत्साही दिसून येत आहेत. दरम्यान, एनडीएत समाविष्ट असलेल्या जेडीयूने अशी मागणी केलीय की मंत्रिमंडळात त्यांचे ४ मंत्री हवे आहेत. जेडीयूचे अध्यक्ष आरसीपी सिंह आणि नितीशकुमार यांची एक दिवस आधी या विषयावर बैठक झाली होती. आता जेडीयूने आरसीपी सिंग यांना दिल्लीला पाठवलंय जेणेकरून कोटा वाढविण्याबाबत ते हाय कमांडशी बोलू शकतील.

मोदी मंत्रिमंडळात २८ पदं रिक्त, २२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार ७ किंवा ८ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. असं सांगितलं जातंय की, सध्या मंत्रिमंडळात २८ मंत्री पदे रिक्त आहेत आणि १७-२२ खासदार मंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजप संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन दिवस चर्चा केलीय.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी जेडीयूचे सूत्र

बिहारमध्ये भाजपचे १७ खासदार आणि केंद्रात ५ मंत्री आहेत. जेडीयूचे १६ खासदार आहेत आणि त्यांच्याकडं केंद्रात मंत्री नाहीत. अशा परिस्थितीत जेडीयूने ४ मंत्री पदं मागितली आहेत. पक्षाचं म्हणणं आहे की त्यासाठी २ मंत्री आणि २ राज्यमंत्री आवश्यक आहेत.

थावर चंद यांच्या जाण्यानं आणखी ३ नेत्यांचा मार्ग मोकळा

थावरचंद गेहलोत यांना सामाजिक न्यायमंत्रीपदावरून काढून कर्नाटकचा राज्यपाल केलंय. भाजपचे राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य यांना आधीच मंत्रिमंडळात मध्य प्रदेशातील कोटा जागा रिक्त झालीय. यासह आणखी ३ नेते मंत्री होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. थावर चंद यांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या राज्यसभेसाठी कैलास विजयवर्गीय, दिनेश त्रिवेदी आणि जितिन प्रसाद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील कोणतेही राज्यसभेपर्यंत पोहोचल्यास त्याला मंत्रीपदाची जबाबदारीही सोपविली जाऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा