शिंदेंचा दावा – राष्ट्रीय पक्ष मदतीला तयार

3

गुवाहाटी, 24 जून 2022: 13 वगळता 42 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला. त्यांनी उपसभापतींना पत्र लिहून शिवसेना विधिमंडळ पक्षाचे खरे नेते असल्याचं म्हटलं आहे. शिंदे यांचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, एक राष्ट्रीय पक्ष त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

4 आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचले

गुरुवारी गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये आणखी काही आमदारांची एंट्री झाली. यामध्ये आमदार संजय राठोड, दादा भुसे, गीता जैन, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, म.स.ली रवींद्र फाटक यांचा समावेश आहे. यापैकी फाटक हे दोन लोकांपैकी आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांशी बोलण्यासाठी सुरतला पाठवले होते. सुरतला पोहोचल्यावर त्यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनाथ शिंदे यांचं मन वळवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा