शिर्डी : शहरात पोलिसींग, बेशिस्त वाहतूक, अवैध व्यवसाय याबाबत नाराजी व्यक्त करून प्रशासनास सतर्क राहून योग्य कारवाई करण्याचे आदेश माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
शिर्डी शहराची बदनामी टाळा, त्यासाठी एकत्रित येऊन अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करा, ग्रामरक्षक दल स्थापन करा, अशा सूचना आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या आहेत.
ग्रामस्थांनी सर्वपक्षीय ग्रामसभा घेऊन पोलीस प्रशानासवर टिकास्त्र सोडले होते. या पार्श्वभूमीवर आ.विखे यांनी बैठक घेऊन ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांची माहिती घेतली.
यावेळी विखे म्हणाले की, एकमेकांना पाठिशी घालण्याची वृत्ती व व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हॉटेलची वर्गवारी करून हॉटेल असोसिएशनची स्वतंत्र वेबसाईट बनवा, आपण प्रत्येक महिन्याला बैठक घेऊ. असे त्यांनी यावेळी सांगितले.